Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत सहायक ग्रंथपाल, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, अर्ज पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय अंतर्गत सहायक ग्रंथपाल, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरु आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
![Ahmednagar Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Ahmednagar-Bharti-2024.jpg)
सहायक ग्रंथपाल, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल. सहायक ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराकडे, यूजीसी/आयसीएआरने विहित केलेल्या नेट/एसएलईटी/सेटसह संबंधित क्षेत्र/विषयातील पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेतून एमबीबीएस किंवा बीएएमएस असावा.
ही भरती अहमदनगर येथे होत असून, अर्ज असोसिएट डीन, पीएएच कृषी महाविद्यालय, हळगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर-413 205 या पत्त्यावर सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mpkv.ac.in/ या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-पोस्टाने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.