अहमदनगर पोलीस विभागात नवीन भरती ! ‘या’ रिक्त पदांच्या जागांसाठी जाहिरात निघाली, केव्हा सुरू होणार अर्ज प्रक्रिया ?

Published on -

Ahmednagar Police Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवक तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की अहमदनगर पोलीस विभागात काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या रिक्त पदांच्या जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या भरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हीही पोलीस दलात नोकरी करू इच्छित असाल तर ही निश्चितच तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे.

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती

पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या रिक्त पदाच्या जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती रिक्त पदांसाठी होणार भरती

या पदभरती अंतर्गत पोलीस शिपाई या पदाच्या 25 रिक्त जागा आणि पोलीस शिपाई चालक या पदाच्या 39 रिक्त जागा अशा एकूण 64 जागांसाठी ही भरती राहणार आहे.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई या पदासाठी किमान बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहे. पोलीस शिपाई चालक या पदासाठीही किमान बारावी पास आणि हलका वाहन चालक परवाना धारक उमेदवार पात्र राहणार आहे.

वयोमर्यादा

पोलीस शिपाई या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 18 ते 28 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील 18 ते 33 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

दुसरीकडे पोलीस शिपाई चालक या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 19 ते 28 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत आणि मागासवर्गीय प्रवर्गातील 19 ते 33 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

निवड कशी होणार

सुरुवातीला फिजिकल टेस्ट घेतली जाईल मग रिटन टेस्ट घेतली जाईल आणि मग कॅरेक्टर सर्टिफिकेट चे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. यानंतर मग मेडिकल टेस्ट घेतली जाईल आणि मग पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अर्ज कुठे करावा लागणार

https://www.mahapolice.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तथापि अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

या भरतीसाठी 31 मार्च 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार

पोलीस शिपाई जाहिरात : https://drive.google.com/file/d/1tV4ev3aUaHf3jLi2abCy6It2wOpQu2DG/view?usp=drivesdk

पोलीस शिपाई चालक जाहिरात : https://drive.google.com/file/d/1eskckjTWQvEdC-DQiJBqjjVwD1Piwyz8/view?usp=drivesdk 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News