Anganwadi Mukhya Sevika Bharti: महाराष्ट्र शासन अंगणवाडी मुख्य सेविका भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Anganwadi Mukhya Sevika Bharti: सरकारी नोकरी शोधताय? तर महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात महिला व बालविकास विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदारांनी आपला अर्ज सादर करावा. तसेच या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

Anganwadi Mukhya Sevika Bharti Details

पदाचे नाव आणि इतर तपशील:

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका / अंगणवाडी सुपरवायझर / पर्यवेक्षिका या पदासाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

शैक्षणिक पात्रता:

अर्जदार उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.)

या भरतीसाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 21 ते 38 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे, तसेच मागासवर्गीय व इतर उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

मासिक वेतन:

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 ते ₹1,12,400 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. तसेच ही सरकारी नोकरी असल्यामुळे उमेदवारांना परमनंट नोकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांना ऑनलाइन अर्ज करताना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागेल-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्त्वाची तारीख:

अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे, उमेदवारांनी या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://icds.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe