Banking Job : देशातील अनेक तरुण बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी कसून अभ्यास करतायेत. जर तुम्हीही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इंडियन बँकेत तुमच्यासाठी नोकरीची संधी चालून आली आहे.
इंडियन बँकेत विविध पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित केली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला इंडियन बँकेत नोकरी करायची असेल तर या भरतीसाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ‘लोकल बँक ऑफिसर’ या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती
या पदभरती अंतर्गत लोकल बँक ऑफिसर या पदाच्या रिक्त असलेल्या 300 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान पदवीधर असावा. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो हे विशेष.
वयोमर्यादा
जाहिरातीनुसार 20 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी असता कामा नये आणि तीस वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट राहणार आहे.
निवड कशी होणार
या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
किती फी भरावी लागेल?
ओपन कॅटेगिरी मधील उमेदवारांना 1000 रुपये आणि आरक्षित कॅटेगिरी मधील उमेदवारांना 175 रुपये फी द्यावी लागणार आहे.
अर्ज कुठं करणार
indianbank.in. या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य आहे. पण अर्ज हा बँकेने दिलेल्या मुदतीतच करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी दोन सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. खरे तर या भरतीसाठी 13 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्थातच इच्छुक उमेदवारांकडे आणखी पाच दिवसांचा काळ बाकी आहे.