Banking Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना बँकेत काम करायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की, देशातील एक आघाडीच्या बँकेने एक पदभरती आयोजित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी एक पदभरती आयोजित केली आहे.
यासाठीची अधिसूचना देखील बँकेकडून निर्गमित करण्यात आली असून यातील एका पदासाठी सातवी पास उमेदवार देखील पात्र राहणार असल्याची माहिती अधिसूचनेतून समोर आली आहे. यामुळे जर तुमचेही बँकेत काम करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. दरम्यान, आता आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या या अधिसूचनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया फॅकल्टी आणि गार्ड कम गार्डनर या दोन पदाच्या रिक्त जागा भरणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
फॅकल्टी : या पदासाठी ग्रामीण विकासामध्ये एमएसडब्ल्यू/एमए/बीएससी पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत. यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
गार्ड कम गार्डनर : या पदासाठी उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच गार्डनिंग बाबतचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. म्हणजे उमेदवाराने शेतीत काम केलेले असणे गरजेचे आहे. या पदासाठी 22 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 23 ऑगस्ट पूर्वी अर्ज करायचे आहेत. अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती अधिसूचनेत दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. centralbankofindia.co.in या वेबसाईटवर तुम्हाला या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.
निवड कशी होणार?
या दोन्ही पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीच लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही. फक्त मुलाखत घेऊन उमेदवार नियुक्त केले जातील.
पगार किती मिळणार
या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार सहा हजारापासून ते वीस हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाणार आहे. या पदभरतीची अधिकची माहिती तुम्हाला अधिसूचनेत मिळणार आहे.