BAVMC Pune Bharti 2024 : पुणे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अंतर्गत भरती सुरु, लवकर करा अर्ज !

Content Team
Published:
BAVMC Pune Bharti 2024

 

BAVMC Pune Bharti 2024 : पुणे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी उमेदवारांनी देय तारखेला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत “प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 16 आणि 23 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.

वरील भरतीसाठी उमेदवार संबंधित विषयात MD/MS/DNB असावा, या भरतीसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. प्राध्यापक पद- खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्ष आणि सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्ष इतकी आहे.

मुलाखती पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे या पत्त्यावर 16 आणि 23 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.bavmcpune.edu.in/ ला भेट द्या.

अशा प्रकारे करा अर्ज

-उमेदवारांनी सदर जाहिराती सोबत जोडलेला अर्ज भरून सोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह संबंधित पत्त्यावर हजर राहावे.
-वेळेच्या 2 तास अगोदर उमेदवारांनी अर्जासह हजर राहावे.
-पात्र उमेदवार शासकीय अथवा निमशासकीय / खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत त्यांनी संबंधित संस्थेकडून ना- हरकत प्रमाणपत्र व नियुक्ती आदेशाच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

निवड प्रकिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 16 आणि 23 जानेवारी 2024 ला घेण्यात येणार आहे.