BECIL Recruitment 2022 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंगमध्ये 54 स्टाफ नर्स आणि PRO पदांसाठी भरती, करा लवकर अर्ज

Published on -

BECIL Recruitment 2022 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि PRO च्या 54 पदांसाठी (Posts) भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या ठिकाणी तुम्हाला संधी आहे.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन (Apply online) स्वीकारले जातील. त्यामुळे उमेदवारांनी संस्थेच्या www.becil.com या वेबसाइटला भेट देऊनच अर्ज करावा.

BECIL मध्ये रिक्त जागा तपशील

या भरती मोहिमेत एकूण 54 पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये 8 पदे वैद्यकीय अधिकारी, एक पद वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, एक पद जनसंपर्क अधिकारी (PRO), दोन पदे कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, दोन योग थेरपिस्ट, 12 पदे स्टाफ नर्स, 10 पदे पंचकर्म तंत्रज्ञ आणि 10 पदे पंचकर्म परिचर व इतर पदे.

अर्ज फी:- सामान्य, ओबीसी, माजी सैनिक, महिला प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, SC-ST आणि EWS साठी, 450 रुपये जमा करावे लागतील.

BECIL भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

तुम्ही अधिकृत वेबसाइट www.becil.com वर जाऊन अर्ज करू शकता.
वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि हार्ड कॉपी सोबत ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News