Maharashtra State Co-Operative Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात घ्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 07 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती
पदाचे नाव
या भरती अंतर्गत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
पदानुसार वयोमर्याद वेगवगेळी असेल.
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 35 ते 55 वर्षे
मुख्य आर्थिक सल्लागार – 45 ते 62 वर्षे
मुख्य जोखीम अधिकारी – 40 ते 60 वर्षे
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. STO या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी 22 नोव्हेंबर 2023 होती आता त्यात वाढ करून 07 डिसेंबर 2023 करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mscbank.com/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अपूर्ण आणि आवश्यक कागदपत्रे नसलेली अर्ज नाकारली जातील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पूर्वी 22 नोव्हेंबर 2023 होती, आता ती वाढवून 07 डिसेंबर 2023 करण्यात आली आहे.
अर्ज देय तारखपूर्वी सादर करावेत.