Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची उत्तम संधी; भरती जाहिरात प्रसिद्ध!

Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : जर तुम्ही मुंबईत स्थित असाल आणि बँकेत नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध जागांसाठी भरती निघाली आहे, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत, यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकता.

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी जर तम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या जागेसाठी उमेदवाराकडे कमीत कमी पदवी तसेच संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 65 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार आपले अर्ज क्षेत्रीय प्रमुख, बैंक ऑफ बड़ौदा, कोटा क्षेत्र प्रनम तल, पुखराज टाबर, स्टेशन रोड कोटा- 324002 या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. लक्षात अर्ज 23 मार्च 2024 पर्यंतच स्वीकारले जातील.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही www.bankofbaroda.in ला भेट देऊ शकता.

अशा प्रकारे करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, लक्षात घ्या उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवावेत.

-लक्षात घ्या अर्ज हा पूर्ण भरलेला पाहिजे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज 23 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe