Baramati Sahakari Bank Bharti 2024 : बारामती सहकारी बँकेअंतर्गत नोकरीची उत्तम संधी; ईमेलद्वारे करा अर्ज !

Baramati Sahakari Bank Bharti 2024

Baramati Sahakari Bank Bharti 2024 : बारामती सहकारी बँक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. भरती संबंधित अधिक माहिती पुढीलप्रमाणे :-

बारामती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक , वित्त, सरव्यवस्थापक, प्रशासन, सरव्यवस्थापक ,वसूली, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

या भरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदराकडे कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान असायला हवे. तसेच यासाठी वयोमर्यादा देखील पदांनुसार वयोमर्यादा वेगवगेळी असेल, यासाठी 23 ते 45 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज pba.recruit.bsb@gmail.com या ई-मेलद्वारे सादर करू शकतो. तसेच अर्ज 12 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. या भरती विषयी आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.baramatibank.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज https://www.baramatibank.com/ या ई-मेलवर पाठवायचे आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे. लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात एकदा वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe