NABARD Bharti 2023 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.. या भरतीअंतर्गत १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
शैक्षणिक पात्रता
जनरल – ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ५५ टक्के गुणांसह किंवा एमबीए/ पीजीडीएम किंवा सीए / सीएस/आयसीडब्ल्यूए किंवा पीएचडी कॉम्प्युटर / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवी किंवा ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
फायनान्स
६० टक्के गुणांसह फायनान्स / बँकिंग विषयात बीबीए / बीएमए किंवा ५५ टक्के गुणांसह मॅनेजमेंट (फायनान्स) विषयात पीजी डिप्लोमा किंवा फायनान्स विषयात एमबीए / एमएमएस किंवा ६० टक्के गुणांसह फायनान्सीयल आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विषयात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सीए/सीएफए/ आयसीडब्ल्यूए.
कंपनी सेक्रेटरी –
कोणत्याही शाखेतील पदवी + सीएस.
सिव्हिल इंजिनिअरिंग –
६० टक्के गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग –
६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
जिओ इन्फॉर्मेटिक –
६० टक्के गुणांसह जिओ इन्फॉर्मेटिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
फॉरेस्ट्री –
६० टक्के गुणांसह फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी
फूड प्रोसेसिंग –
६० टक्के गुणांसह फूड प्रोसेसिंग/ फूड टेक्नॉलॉजी विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
स्टॅटेस्टिक-
६० टक्के गुणांसह स्टॅटेस्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
मास कम्युनिकेशन / मीडिया स्पेशलिस्ट –
६० टक्के गुणांसह मास मीडिया/ कम्युनिकेशन / जनरलीजम / अडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी +संबंधित विषयात डिप्लोमा.
* वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग २१ ते ३० वर्षे.
ओबीसी-३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला / ओबीसी / ओबीसी – ८०० रुपये.
मागासवर्गीय / पीडब्ल्यूबीडी – १५० रुपये
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
* महत्त्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात २ सप्टेंबर २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०२३
अधिकृत बेवसाइट – https://ibpsonline.ibps.in/nabardaug23