BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत, लक्षात घ्या अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर सीएच. हॉस्पिटल अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15, 18, 19 जानेवारी 2024 आहे. (पदांनुसार)
या भरतीसाठी MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology) अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 38 वर्षे ते ४३ वर्षे इतकी आहे. ही भरती मुंबई येथे होत असून, उमेदवार डिस्पॅच विभाग, T. N चा तळमजला. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,00,000 रुपये इतका पगार मिळेल. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट देऊ शकता.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15, 18, 19 जानेवारी 2024 आहे. (पदांनुसार)
-लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 580/- + GST 18%. इतके आहे.
-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.