BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, वाचा…

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :-

मानव संसाधन समन्वयक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरील भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज शुल्क

येथे अर्ज शुल्क भरणे देखील आवश्यक आहे. खुला प्रवर्ग – 1000/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये असे शुल्क आहे.

नोकरी ठिकाण

वरील भरती मुंबईत होत असून, नोकरी ठिकाण देखील मुंबई आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून,
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 पर्यंत आहे तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

अधिकृत वेबसाईट

वरील भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcgm.gov.in/ ला वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तर अर्ज 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहे.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe