BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना मिळेल नोकरी, वाचा सविस्तर…

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (व्यावसायिक थेरपी), सहाय्यक प्राध्यापक (नेत्ररोग), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), बालरोग सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (ग्रेड I), सहाय्यक व्यावसायिक थेरपिस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (ग्रेड II), विशेष शिक्षक (ग्रेड I), विशेष शिक्षक (ग्रेड II), ऑर्थोपेडिक्स सल्लागार, ऍनेस्थेटिस्ट, व्यावसायिक सल्लागार, व्यवस्थापक, समुदाय विकास अधिकारी, दंत तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ई.ई.जी. तंत्रज्ञ” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी आल्यास https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.