Cantonment Board Pune : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. येथे विविध जागांसाठी भरती निघाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर यासाठी पात्रता काय आहे? जाणून घेऊया…
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, ऑर्थोपेडिक, Gyn आणि Obst, ENT विशेषज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, त्वचा विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 मार्च 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, येथे MBBS/M.S./D.N.B/ उमेदवारांना प्रधान्य दिले जाईल. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी अर्जासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर. गुरुद्वारा, मुंबई-पुणे हायवे, देहू रोड, पुणे – ४१२१०१. या पत्त्यावर 22 मार्च 2024 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर https://dehuroad.cantt.gov.in ला भेट द्या.
निवड प्रकिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज आणि कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 मार्च 2024 रोजी हजर राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.