CAPF Medical Officer Recruitment 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत “सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट), मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)” या पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
![CAPF MEDICAL OFFICER RECRUITMENT 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/10/CAPF-MEDICAL-OFFICER-RECRUITMENT-2024-.jpg)
CAPF Medical Officer Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत खालील पदांसाठी एकूण 345 रिक्त जागांसाठी भरती होत आहे-
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड) | 05 जागा |
02. | स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) | 176 जागा |
03. | मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) | 164 जागा |
एकूण | 345 जागा |
शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक 01: (i) MBBS (ii) संबंधित विषय पदवीधर पदवी / डिप्लोमा (iii) D.M / M.Ch. + तीन वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 02:.(i) MBBS (ii) संबंधित विषय पदवीधर पदवी / डिप्लोमा (iii) 1.5 वर्ष किंवा 2.5 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 03: (i) औषधांच्या ऍलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटरनशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतु नियुक्तीपूर्वी इंटरनशिप अनिवार्य असणार आहे. (iii) D.M / M.Ch. + तीन वर्षांचा अनुभव
शारीरिक पात्रता:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांची शारीरिक पात्रता सुद्धा असणे आवश्यक आहे, शारीरिक पात्रता खालील प्रमाणे-
- उंची: पुरुषांसाठी (157.5 से.मी.), महिलांसाठी (142 से.मी.)
- छाती: 77.82 सेंटीमीटर
- वजन: उंची आणि वयाच्या प्रमाणात वजन असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहे त्यांचे वय 14 नोव्हेंबर 2024 रोजी,
- पद क्र. 01: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र. 02: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र. 03: 30 वर्षांपर्यंत
- [SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट , OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षें सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- General / OBC / EWS: ₹400/-
- SC / ST / ExSm / महिला: फी नाही.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
महत्त्वाच्या लिंक:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (16 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mha.gov.in/ |