Indian Navy Fireman Bharti : 10वी नंतर थेट भारतीय नौदलात मिळणार नोकरी; वाचा सविस्तर…

Indian Navy Fireman Bharti

Indian Navy Fireman Bharti : भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख भरती सुरु झाल्यापासून 60 दिवस आहे.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास झालेल्या उमेदवारांना संधी मिळेल.

वयोमर्यादा

वरील पदासाठी 56 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी)} मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यापासून 60 दिवस आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. लक्षात घ्या अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख भरती प्रक्रिया सुरु झाल्यापासून 60 दिवस आहे.

-अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe