MPSC Police Complaints Authority : गमावू नका हा गोल्डन चान्स! MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत निघाली भरती!

Content Team
Published:
MPSC Police Complaints Authority

MPSC Police Complaints Authority : MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे असेल :-

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण : विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किंवा राज्य शासनाच्या सचिव दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला सेवानिवृत्त अधिकारी

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण : पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त अधिकारी

अर्ज पद्धती

या भरती अंतर्गत अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज आयोगास सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mpsc.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe