EPFO Recruitment 2025:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडेच कायद्यातील तरुण व्यावसायिक (YP) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यंग प्रोफेशनल्स (YP) या उपक्रमाचा उद्देश संस्थेच्या कायदेशीर बाबी हाताळण्यात मदत करणे आणि त्यात सुधारणा करणे आहे.
हे पदं कायदेशीर, संशोधन आणि डेटा व्यवस्थापनाशी संबंधित असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकाराची लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या आधारावर एक मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
या पदासाठी उमेदवारांचे वय ३२ वर्षांपेक्षा कमी असावे. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ६५,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. या पदावर असलेल्या व्यक्तीला कायदेशीर आणि संस्थेच्या कार्यक्षेत्राशी संबंधित बाबी हाताळण्याची जबाबदारी असेल.
अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि इच्छुक उमेदवारांनी epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून त्यात आवश्यक माहिती भरून निर्धारित ईमेल पत्त्यावर सबमिट करावा लागेल. याव्यतिरिक्त याबाबतची अंतिम तारिख आहे, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) मिळवलेली असावी. यापूर्वी एलएलबी किंवा बीए एलएलबी या क्षेत्रातील अभ्यास किंवा संशोधन अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल.
एलएलएम किंवा पीएच.डी असलेल्या व्यक्तींना या पदासाठी विशेष प्राधान्य मिळू शकते. तसेच, कोणत्याही प्रकाराच्या प्रकाशित पेपर, संशोधन कार्य, किंवा संबंधित क्षेत्रातील कौशल्य यामुळे उमेदवारांच्या पात्रतेत आणखी वाढ होऊ शकते.
निवड कशी केली जाईल?
भरती प्रक्रियेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखी परीक्षा नाही. निवडीची प्रक्रिया मेरिट-आधारित असेल. म्हणजे उमेदवारांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि संशोधन क्षमतेनुसार शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त योग्यतेचे प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ईपीएफओला या प्रक्रियेत बदल करण्याचा किंवा उमेदवारांचा अर्ज नाकारण्याचा अधिकार आहे.
निवडीनंतर मिळणारे लाभ
EPFO मध्ये निवड झालेल्या यंग प्रोफेशनल्सना दरवर्षी १२ दिवसांची वार्षिक रजा मिळते. ती रजा प्रत्येक महिन्याच्या कामाच्या आधारावर विभागली जाईल.
तसेच सार्वजनिक सुट्ट्यांवर आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवसांवर रजा लागू होणार नाही. याव्यतिरिक्त १२ दिवसांपेक्षा जास्त रजा घेतल्यास ती स्टायपेंडमधून वजा केली जाईल आणि वापरली न गेलेली रजा पुढील वर्षासाठी हस्तांतरण केली जाणार नाही.
या भरतीसाठी अंतिम अर्ज सादर करण्याच्या तारखेपूर्वी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज संबंधित ईमेलवर सबमिट करणे अनिवार्य आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी लवकरच अर्ज सादर करणे गरजेचे आहे. EPFO चे हे भरती अभियान देशातील अनेक तरुणांना आपल्या कर्तृत्वाचा ठसा जागतिक स्तरावर उमठविण्याची संधी प्रदान करेल.