ESIC Pune Bharti 2024 : ESIC पुणे मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड!

Content Team
Published:
ESIC Pune Bharti 2024

 

ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार असून, मुलाखतीची तारीख खाली दिली आहे.

वरील भरती “पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक” पदांसाठी होत आहे. या भरती अंतर्गत एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, मुलाखतीची तारीख 01 आणि 02 मार्च 2024 असून, उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

वरील भरती साठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल.

पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ : MBBS with P.G Degree or equivalent from recognized university

ज्येष्ठ निवासी : MBBS with PG Degree or Equivalent / PG Diploma in concerned specialty from recognized university

अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक : Degree in Ayurveda from a recognized university/ Statutory Board/ Counsil/ Faculty of Indian Medicine

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी अर्जासह ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690, बिबवेवाडी, पुणे-37 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

नोकरी ठिकाण

वरील भरती पुण्यात होत असून नोकरीचे ठिकाण देखील पुणे आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा पदांनुसार आवश्यक असेल, पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी पदासाठी 45 वर्षे तर अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक पदासाठी 35 वर्षे इतकी आहे.

मुलाखतीची तारीख

मुलखात 01 आणि 02 मार्च 2024 रोजी होणार आहे तरी उमेदवारांनी वेळेत हजर राहावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील अथवा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर https://www.esic.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवडमुलाखती द्वारे होणार आहे, तरी उमेदवारांनी अर्जासह वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

आवश्यक कदपत्रे

वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे, नोंदणीचे नूतनीकरण, जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे, आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास NOC, दोन फोटो.

भरती जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.