Gokhale Education Society Application : गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्जं मागवले जात आहेत, तुम्ही देखील मुंबईत एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे, या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड कोणत्या आधारावर होणार आहे पाहूयात…
वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 05 आणि 6 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
अर्ज शुल्क
या पदांकरिता अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 200/- रुपये इतके आहे.
निवड प्रक्रिया
या भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी सोसायटीचे श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोरिवली (प), मुंबई-९१ सोसायटीचे एन.बी. मेहता (वलवाडा) सायन्स कॉलेज, बोर्डी, जि. पालघर. येथे संबंधित तारखेला मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीसाठी उमेदवारांनी 05 आणि 6 एप्रिल 2024 रोजी हजर राहायचे आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://gesociety.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
-उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह आणि अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 05 आणि 6 एप्रिल 2024 असून उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.













