Tata Institute of Social Sciences : जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत लेखापाल पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
कॉमर्स आणि अकाउंटन्सी आणि संबंधित क्षेत्रात बॅचलर/मास्टर्स डिग्री आणि प्रोजेक्ट फायनान्स आणि अकाउंट्स मॅनेजमेंटच्या कामात दोन वर्षांचा कामाचा अनुभव आणि उत्तम लेखन आणि बोलण्याचे कौशल्य असले पाहिजे.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई (महाराष्ट्र) येथे होत आहे.
वेतनमान
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 45,000/- रुपये इतका पगार मिळेल.
ई-मेल पत्ता
वरील जागांसाठी अर्ज [email protected] / [email protected] या ईमेल वर पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.tiss.edu या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत,
-अर्ज वर दिलेल्या ईमेलद्वारे पाठवायचे आहेत.
-ई-मेलद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.