IITM Pune Bharti 2024 : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पदवीधर उमेदवारांसाठी ‘या’ ठिकाणी निघाली भरती….

IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्हीही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने संबंधित लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “आयआयटीएम रिसर्च असोसिएट, आयआयटीएम रिसर्च फेलो” पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल :-

आयआयटीएम रिसर्च असोसिएट : Doctorate degree from a recognized University

आयआयटीएम रिसर्च फेलो : M. Tech. in Atmospheric/ Oceanic Sciences or related subjects.

वयोमर्यादा

आयआयटीएम रिसर्च असोसिएट पदासाठी वयोमर्यादा 35 वर्ष तर आयआयटीएम रिसर्च फेलो पदासाठी वयोमर्यादा 28 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.tropmet.res.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.tropmet.res.in/Careers या वेबसाईटद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe