ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे, त्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाच्या (CBO) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 मे असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सादर करू शकतात.
किती आहेत जागा?
स्टेट बँकेने काढलेल्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 3 हजार 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी निवड ऑनलाइन चाचणी, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता या चाचणीवर आधारित असणार आहे.

काय आहे पात्रता?
या जागांसाठी अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. मेडिसिन, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये पदवी असलेले उमेदवार देखील, या भरतीसाठी पात्र असणार आहे. तसेच अर्जदारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
किती आहे शुल्क?
सीबीओ या पदासाठी सामान्य/ओबीसी/ईडब्लूएश या प्रवर्गासाठी 750 रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नसेल. उमेदवारांना अर्ज शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरावे लागेल.
अर्ज कसा करावा ?
– सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– होमपेजवरील करिअर विभागावर क्लिक करा.
– SBI CBO- 2025 अर्ज लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
– तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा.
– त्यानंतर तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा.
– आवश्यक कागदपत्रे, स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
– अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.