IPGL Mumbai Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड अंतर्गत मिळणार नोकरी, फक्त करा ‘हे’ काम!

IPGL Mumbai Bharti 2024

IPGL Mumbai Bharti 2024 : इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड मुंबई अंतर्गत “मुख्य वित्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर अर्ज ऑफलाईन 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदरच स्वीकारले जातील, नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

वरील भारती साठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, यासाठी अर्ज दार B.com झालेला असावा. तसेच वयोमर्यादा 62 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.

उमेदवारांनी अर्ज व्यवस्थापकीय संचालक, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, मुजावर पाखाडी रोड, माझगाव, मुंबई – 400 010 या पत्त्यावर पोस्टाने 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट http://www.ipgl.co.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज पोस्टाने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 असून, विहित तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe