BMC Bharti 2024 : पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, ते पुढीलप्रमाणे :-
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता
यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्गाकरीता 1000/- रुपये (सर्व करासहित), मागासप्रवर्गाकरीता 900/- रुपये (सर्व करासहित) असे शुल्क आकारले जातील.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही https://portal.mcgm.gov.in/ ला भेट द्या.
अशा प्रकारे करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज 30 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. आणि आपले अर्ज संबंधित लिंकद्वारे सादर करावा.