Pune Vidyarthi Griha : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
येथे सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार पद्युत्तर तसेच लायब्ररी सायन्सची डिग्री घेतलेला असावा.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
उमेदवारांनी [email protected] या ईमेलवर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pvgcoet.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचा आहे.
-उमेदवारांनी अर्ज वरील ईमेलवर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
-तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.