HBCSE Bharti 2024 : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज !

HBCSE Bharti 2024

HBCSE Bharti 2024 : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, व्यापारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज https://secure.hbcse.tifr.res.in/posts/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

तसेच प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीकरिता उमेदवारांनी 11, 13 आणि 14 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे. मुलाखतीकरिता उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

वयोमार्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा देखील आहे. प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदांसाठी 40 वर्षे तर प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी पदांसाठी 28 ते 31 वर्षे आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी 28 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई : Ph.D. in Science, Mathematics, Engineering, Science/ Mathematics Education or a related field from a recognized University/Institute.

प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी : Full-time B.Sc./ B.S. (in any stream of Science or Mathematics) from a recognized University/Institute with an aggregate of 60% marks or equivalent CGPA

व्यापारी प्रशिक्षणार्थी : ITI i.e. National Trade Certificate (NTC) (aggregate of 60% marks) awarded by National Council of Vocational
Training (NCVT) in ‘Plumber’.

असा करा अर्ज

-या भरतीसाठी प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदाकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा. भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://hbcse.tifr.res.in/ ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, व्यापारी प्रशिक्षणार्थी या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी 11, 13 आणि 14 मार्च 2024 या तारखेला हजर राहायचे आहे.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सोबत आणावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe