IRCTC Bharti 2024 : पदवीधारक असाल तर IRCTC मध्ये मिळेल नोकरी; मुलाखतीद्वारे होणार निवड

Content Team
Published:
IRCTC Bharti 2024

IRCTC Bharti 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, चला जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “पर्यटन मॉनिटर्स” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

येथे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028 या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 03 जुलै 2024 आहे, तरी उमेदवारांनी येथे कार्यालयीन वेळेत अर्जासह हजर रहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.irctc.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

-लक्षात घ्या केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

-सदर पदांकरिता मुलाखती 03 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe