Maharashtra State Security Corporation : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी कशा प्रकारे अर्ज करायचे आहेत, जाणून घ्या…
वरील भरती अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
या भरती साठी ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार असून, अर्ज 05 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mahasecurity.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या वर दिलेल्या टिप्स फॉलो करूनच अर्ज सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 असून देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.