Naval Dockyard Mumbai Bharti : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, पहा…
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड II, मल्टी टास्किंग स्टाफ” पदाच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
येथे 10 वी आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत होत आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज मुख्य गुणवत्ता ॲश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट (नेव्हल स्टोअर्स), DQAN कॉम्प्लेक्स, 8वा मजला, नेव्हल डॉकयार्ड, टायगर गेट मुंबई – 400023 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2024 आहे. तरी अर्ज देय तारखे सादर करायचे आहेत.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.