DRDO ACEM Nashik Bharti 2024 : DRDO अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवाराने संबंधित विषयात डिप्लोमा केलेला हवा, यासाठी उमेदवाराने भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपले अर्ज सादर करावे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज [email protected]. या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.drdo.gov.in/ या लिंकला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने [email protected]. येथे सादर करायचा आहे.
-पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारासाठी राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर (www.mhrdnats.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे.
-तसेच अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.