Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Army ने NCC स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही! ही सुवर्णसंधी अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी उपलब्ध असून, शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) नॉन-टेक्निकल) अंतर्गत 70 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. भारतीय सैन्यात अधिकारी बनणे ही केवळ प्रतिष्ठेची गोष्ट नसून, देशसेवा करण्याची संधी आणि उच्च वेतनासह उत्तम करिअर मिळवण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवार 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीत NCC स्पेशल एन्ट्री अंतर्गत एकूण 70 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यात पुरुष आणि महिलांसाठी खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत: NCC पुरुष (सामान्य प्रवर्ग) – 63 पदे NCC पुरुष (विशेष प्रवर्ग – वॉर वायडोज) – 7 पदे NCC महिला (सामान्य प्रवर्ग) – 5 पदे NCC महिला (विशेष प्रवर्ग – वॉर वायडोज) – 1 पद ही जागा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) नॉन-टेक्निकल शाखेसाठी आहे आणि यामध्ये अधिकारी पदासाठी थेट संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 50% गुणांसह पदवी (Graduation) पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र मागील वर्षांमध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत. याशिवाय, NCC ‘C’ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा: किमान वय: 19 वर्षे, कमाल वय: 25 वर्षे.
अर्ज कसा करावा ?
उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर (joinindianarmy.nic.in) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सबमिट करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. फॉर्म सबमिट केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी वेळोवेळी वेबसाइटवर अपडेट तपासावा.
जर तुम्ही भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे. लेखी परीक्षेशिवाय केवळ SSB मुलाखतीच्या आधारे तुम्हाला Indian Army मध्ये अधिकारी बनता येईल. 15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.