Jijamata Senior College Bharti : पुणे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयात ‘या’ जागांसाठी निघाली भरती, बघा शैक्षणिक पात्रता

Jijamata Senior College Bharti 2024 : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरवांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, तरी उमेदवारांनी मुलाखती करिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “सहायक सहायक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपीक, वसतिगृह अधीक्षक (महिला)” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 19 मे 2024 रोजी हजर राहायचे आहे. तसेच, पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन (ई-मेल) किंवा पोस्टाने पाठवू शकतात.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

निवड प्रक्रिया

वरील जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे या पत्त्यावर हजर राहायचे आहे,

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीसाठी 19 मे 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sggpjijamatacollege.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

-पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.

-मुलाखतीस येताना सोबत अर्ज आणि कागदपत्रे आणावीत.

-लक्षात घ्या वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

-सदर पदांकरीता मुलाखत 19 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.