DRDO Pune Recruitment 2025 | पुण्यातील Defense Research and Development Organization (DRDO) अंतर्गत Armament Research & Development Establishment (ARDE) संस्थेत 2025 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पदवीधर अभियंता अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI ट्रेड अप्रेंटिस या विविध पदांसाठी होणार आहे. एकूण 120 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, ही नोकरी DRDO सारख्या प्रतिष्ठित संस्थेत मिळवण्यासाठी एक मोठी संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 4 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख 20 एप्रिल 2025 आहे. अर्ज करणाऱ्यांनी DRDO च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीविषयीची संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावा. भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे आणि उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाण्याची शक्यता आहे.

पदांची माहिती-
पदवीधर अभियंता अप्रेंटिस – 32 जागा (वेतन: ₹15,000/महिना)
डिप्लोमा अप्रेंटिस – 18 जागा (वेतन: ₹14,000/महिना)
ITI ट्रेड अप्रेंटिस – 70 जागा (वेतन: ₹13,000/महिना)
पात्रता काय?
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, पदवीधर अभियंता अप्रेंटिससाठी संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा HR/डेटा अॅनालिटिक्समध्ये MBA/M.Sc. ची आवश्यकता आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ITI ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमधील ITI आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. यामध्ये आरक्षणानुसार वयामध्ये सूट दिली जाऊ शकते. नोकरीचे ठिकाण पुणे असून, डीआरडीओसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी केवळ सरकारी नोकरीसाठी इच्छुक नव्हे तर संशोधन आणि तंत्रज्ञानात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.