MPSC Bharti 2024 : MPSC मार्फत तब्बल दीड लाख पगाराची नोकरी, अप्लाय करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

MPSC Bharti 2024 : MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे, या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, जाणून घ्या.

वरील भरती अंतर्गत “राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज शे 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण : विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राज्य शासनाच्या सचिव दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला सेवानिवृत्त अधिकारी

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण : पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त अधिकारी

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज आयोगास सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mpsc.gov.in/ ला भेट द्या.

वेतन

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण : दरमहा १,३७,७००/- रुपये

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण : दरमहा १,३७,७००/- रुपये

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.