Pune Contonment Board : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे ‘या’ पदांकरिता भरती; पगार असणार 75 हजार रुपये…

PUNE Contonment Board

PUNE Contonment Board : पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी चांगली आणि उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “व्हिजिटिंग ऍनेस्थेटिस्ट, एएमओ ऍनेस्थेटिस्ट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 10 एप्रिल 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

पद्युत्तर उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी उमेदवारांनी सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल पुणे – 1 निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय, SVP SCCH, समोर होणार आहे. गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे 411 001 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 असून, अर्जासह उमेदवारांनी येथे हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ ला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75,000/- रुपये इतका पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

-तसेच आवश्यक कागदपत्रे देखील सोबत आणणे महत्वाचे आहे.

-लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

-मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe