Kolhapur Mahanagarpalika Recruitment : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना सरकारी नोकरी हवी असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतची अधिसूचना देखील महानगरपालिकेकडून निर्गमित करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेने या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले आहेत. महत्वाचे म्हणजे या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीने होणार आहे. म्हणजेच उमेदवारांना कोणतीच परीक्षा द्यावी लागणार नाही.
थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या भरतीसाठी नक्कीच अर्ज केला पाहिजे. दरम्यान आता आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
महानगरपालिकेच्या इस्टेट विभागातील जीवरक्षक आणि पंप ऑपरेटर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
जीवरक्षक : या पदासाठी १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. पण, उमेदवाराला पोहता यायला हवे. तसेच संबंधित व्यक्तीला २ वर्षाचा कामाचा अनुभव सुद्धा असायला हवा.
पंप ऑपरेटर : या पदासाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. पण संबंधित उमेदवाराने इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा
या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असायला नको. म्हणजेच या पदांसाठी कमाल 45 वर्षे वयाचे उमेदवार पात्र राहणार आहेत.
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना 11 हजारापासून ते 16 हजार रुपयांपर्यंतचे मासिक वेतन दिले जाणार आहे.
निवड कशी होणार
या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतीच लेखी किंवा तत्व परीक्षा घेतली जाणार नाही.
मुलाखत कधी अन कुठं होणार
या भरतीची मुलाखत सहा सप्टेंबरला म्हणजे येत्या चार दिवसांनी होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर ही मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज कुठं करायचा
यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करायचा आहे. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज पाठवावा लागणार आहे.