MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील महाराष्ट्र कृषी विद्यापीठात निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

MAURB Pune Vacancy 2024

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी उमेदवार कोणत्याही संस्थेतून कृषी विषयात पीएच.डी. झालेला असावा

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ, (MCAER), 132/B, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे-411007 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcaer.org/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील महत्वाचे आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe