Maharashtra Government Job : अलीकडे तरुणाईचा माईंड सेट चेंज झाला आहे. तरुणांना आता एकतर सरकारी नोकरी हवी आहे किंवा मग स्वतःचा व्यवसाय करावासा वाटत आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने काही रिक्त पदांसाठी नुकतीच जाहिरात काढली आहे. या जाहिरातीनुसार या संबंधित विभागात शिपाई पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाने काढलेल्या या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या विभागात शिपाई या रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या पदभरती अंतर्गत विभागातील तब्बल 125 शिपायांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदासाठी आवश्यक पात्रता ?
सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, शिपाई या पदासाठी किमान एसएससी अर्थातच दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 18 ते 34 या वयोगटातीलच असणे अनिवार्य आहे. अर्थातच किमान 18 वर्षे आणि कमाल 34 वर्ष वय असलेले उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत.
किती पगार मिळणार?
या पदासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्याला पंधरा हजार रुपये ते 47 हजार 600 रुपये प्रति महिना पर्यंतचा पगार मिळणार आहे. तसेच नियमानुसार अनुज्ञय करण्यात आलेले भत्ते देखील संबंधित निवड झालेल्या कर्मचाऱ्याला दिले जाणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार बरं
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन संबंधित विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या पदभरतीची सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जाहिरातीत दिलेल्या पात्रता ग्रहण करणाऱ्या उमेदवारानेच केवळ या पदासाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. www.dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज विहित मुदतीत सादर करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदासाठी 23 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करता येणार आहे. विहित कालावधीमध्ये उमेदवाराने अर्ज सादर करणे आवश्यक असून विहित कालावधी उलटल्यानंतर उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.
जाहिरात कुठे पाहणार
लिंक वर जाऊन इच्छुकांना या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.