Maharashtra State Co-Operative Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईमध्ये सध्या विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठीची प्रक्रिया सुरु झाली असून, गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत. या भरती अंतर्गत कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, जाणून घेऊया…
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 असून, उमेदवारांनी आजच्या आजच या अर्ज सादर करा.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी B.E/ B.Tech झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा २८ ते ३५ वर्षे इतकी आहे. लक्षात घ्या या पुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क 1,770/- (Includes GST) रुपये आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख
यासाठी ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tmscbljan24/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे एकच दिवस शिल्लक आहे तरी ताबडतोब आपले अर्ज सादर करा.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास उमेदवार https://www.mscbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो.
अशा प्रकारे कार अर्ज
-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tmscbljan24/ या लिंकद्वारे सादर करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.
-अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, अर्जात माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.