Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज देय तारखे अगोदर पाठवू शकतात.
शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यक्रम अंतर्गत “डॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन प्रक्रिया 29 जानेवारी 2024 पासून सुरु होत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
![Malegaon Mahanagarpalika Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Malegaon-Mahanagarpalika-Bharti-2024.jpg)
वरील पदासाठी उमेदवार पदवीधर असावा तसेच संगणक प्रमाणपत्र, दुचाकी चालविण्याचा परवाना, असला पाहिजे. येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ३८ वर्ष इतकी आहे, या पुढील उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.
ही भरती मालेगाव, नाशिक येथे होत असून, अर्ज शहर क्षयरोग केंद्र, मेन गेट जवळ, जुनी इमारत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे पोस्टाने पाठवायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट http://www.malegaoncorporation.org/ ला भेट द्या.
असा करा अर्ज
-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज प्रक्रिया 29 जानेवारी 2024 पासून सुरु होईल.
-तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.