महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेत निघाली मेगाभरती ! 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी, दरमहा 75 हजार पगाराची नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या महापालिकेत विविध रिक्त पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

Vasai Virar Mahapalika Bharati : सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना मुंबईनजीक नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे कारण की, वसई विरार महापालिकेत एक मेगा भरती निघाली आहे.

या पदभरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महापालिकेत रिक्त पदांच्या 100 हुन अधिक जागा भरल्या जाणार असून याची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. यामुळे जर तुम्हालाही वसई विरार महापालिकेच्या पदभरतीत अर्ज करायचा असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी निघाली भरती ?

वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदभरतीच्या अंतर्गत महापालिकेतील आरोग्य विभागाच्या बालरोग तज्ज्ञ, साथीचे रोग तज्ञ, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स स्त्री, स्टाफ नर्स पुरुष, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती रिक्त जागा भरल्या जाणार ?

या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या जवळपास 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये बालरोग तज्ञाची एक जागा भरली जाणार आहे. साथीचे रोग तज्ञ या पदाची एक जागा भरली जाणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या 13 जागा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या 20 जागा, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 37 जागा, स्टाफ नर्स स्त्री या पदाच्या आठ जागा, स्टाफ नर्स पुरुष या पदाची एक जागा, औषध निर्माता या पदाची एक जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या एकूण तीन जागा आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदाच्या एकूण 25 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी 12 वी सायन्स उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी B.Sc., DMLT पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत.
औषध निर्माता या पदासाठी D.Pharm/B.Pharm पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत.
स्टाफ नर्स (स्त्री-पुरुष) या पदासाठी GNM/B.Sc. (Nursing) उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील अशी माहिती अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी या तीनही पदासाठी MBBS पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. साथरोग तज्ज्ञ या पदासाठी MBBS/BDS/ AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health) पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत. बालरोग तज्ज्ञ या पदासाठी MD Paed/DCH/DNB पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत.

वयोमर्यादा किती असावी ?

मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे आणि बाकीच्या पदांसाठी उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.

निवड कशी होणार?

अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीनुसार, बालरोग, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि बाकीच्या पदांसाठी मूल्यांकनाधिष्ठित ‘मेरिट’ यादीवर आधारित निवड केली जाणार आहे.

पगार किती मिळणार?

या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 18 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

अर्ज कुठे करणार

उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, त मजला, यशवंत नगर, विरार या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

या भरतीसाठी उमेदवारांना 28 मे ते 5 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तसेच 28 मे ते पाच जून दरम्यान मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe