MUCBF Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत “कनिष्ठ लिपिक ग्रेड – २” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
![MUCBF Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-MUCBF-Bharti-2024.jpg)
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. ही भरती नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद येथे होत असून, उमेदवारांनी अर्ज https://rect-116.mucbf.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय २२ ते३५ वर्षे इतके असावे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास https://www.mucbf.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे पाठवायचे आहेत.
-अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहेत.
-येथे अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क १,०००/- अधिक १८% जी.एस.टी असे आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.