CCI Mumbai Bharti : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “कंपनी सचिव” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
वरील भरतीसाठी उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुमच्यकडे वकिली डिग्री किंवा उमेदवार MBA झालेला असावा. तसेच यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.
इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज उपमहाव्यवस्थापक (HRD), द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. कापस भवन, प्लॉट नं.3 ए, सेक्टर-10, सीबीडी बेलापूर, नवी-मुंबई – 400 614 (M.S) या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://cotcorp.org.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तसेच अर्ज 01 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचावी.