राजधानी मुंबईत नोकरीची संधी, महानगरपालिकेत निघाली ‘या’ पदासाठी मेगा भरती !

Tejas B Shelar
Published:

Mumbai Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या दिवसात मुंबईत नोकरीं शोधणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राजधानी मुंबईत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काही रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत नोकरी पाहू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी राहणार आहे.

जर तुमचेही राजधानीत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर निश्चितच ही तुमच्यासाठी एक मोठी संधी राहील. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघालेल्या या नवीन भरतीची अधिसूचना देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे.

तसेच इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या भरतीची सविस्तर माहिती. 

कोणत्या पदासाठी निघाली भरती ?

BMC मध्ये लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती निघालेली आहे.

किती जागांसाठी होणार भरती ?

महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदभरती अंतर्गत महानगरपालिका लायसन्स इन्स्पेक्टर या पदाच्या 118 रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदासाठी पदवीधारक उमेदवार पात्र राहतील.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी कमाल 43 वर्ष वय असलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. यापेक्षा अधिकचे वय असल्यास उमेदवार यासाठी अपात्र राहतील.

नोकरी करण्याचे ठिकाण

मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या या पदभरती अंतर्गत जें उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना राजधानीत अर्थातच मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.

पगार किती मिळणार ?

या भरतीअंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 29 हजार 200 ते 93,300 एवढे वेतन मिळणार आहे.

अर्ज कुठे करणार 

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार ?

येत्या 20 एप्रिल 2024 पासून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज भरलेल्या संकेतस्थळावर जाऊन करावा लागणार आहे ऑफलाइन अर्जाची सुविधा नाही याची नोंद इच्छुक उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 17 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करता येतील अशी माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. या भरतीची सविस्तर तपशीलवार माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही या भरतीची जाहिरात पाहू शकणार आहात. 

जाहिरात कुठे पाहता येणार ?

https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice या लिंक वर जाऊन या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe