IPRCL Bharti 2024 : इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, म्हणजेच अर्ज खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक/उप. व्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
![IPRCL Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/IPRCL-Bharti-2024-.jpg)
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार पदव्युत्तर असणे आवश्यक आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी, आणि पदांनुसार अर्ज सादर करावा. वरील पदांसाठी वयोमर्यादा देखील वेगवेगळी असेल, येथे 30 ते 57 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
वरील पदांसाठी ऑफलाईन अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व). मुंबई-400010. या पत्त्यावर पोस्टाने 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत, तसेच तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास
अधिकृत वेबसाईट https://www.iprcl.in/ ला भेट देऊ शकता.
असा करा अर्ज
-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने यावर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे, लक्षात घ्या अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदरच सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे, लक्षात घ्या अर्ज पूर्ण आणि व्यवस्थित भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-यावर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीरकाला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरती सूचना वाचणे देखील आवश्यक आहे. सर्व अटी लक्षात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावा.