MUHS Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून, यासाठी देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
![MUHS Nashik Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-MUHS-Nashik-Bharti-2024.jpg)
यासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे, यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. या भरतीसाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील. ही भरती पुण्यात सुरु असून, उमेदवार अध्यक्ष, मोहम्मदिया टिब्बिया कॉलेज आणि असेयर हॉस्पिटल, पोस्ट बॉक्स. 128, मन्सूरा, मालेगाव. जिल्हा-नाशिक- 423203 या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.muhs.ac.in/ ला भेट देऊ शकता.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून अर्ज देय तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.
–उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.