New India Assurance Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, ते पुढीलप्रमाणे :-
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसादर करण्याची प्रक्रिया सुरु असून उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, तसेच यासाठी 21 ते 30 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. उमेदवार ऑनलाईन अर्ज https://www.newindia.co.in/portal/ या लिंडक्वारे सादर करू शकतात. जरी तुम्हाला भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/ ला भेट देऊ शकता.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जसोबत आवश्यक कागपदपत्रे अपलोड करणे देखील गरजेचे आहे, तसेच अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे देखील गरजेचे आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे अर्ज पाठवू शकता.