NHM Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर येथे अर्ज करू शकता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 10 एप्रिल 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट : एम. बी.बी.एस., एम.डी (पीएसएम)
बालरोगतज्ञ : एम. बी.बी.एस., एम.डी (बालरोग)
मानसोपचार तज्ज्ञ : एम.बी.बी.एस., एम.डी (मानसोपचारतज्ञ)
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस., बी.डी.एस, बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस. बी.यु.एम.एस) सह एम.पी.एच / एम.एच.ए किंवा एम.बी.ए हेल्थ केअर
वयोमर्यादा
वरील पदांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास https://arogya.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरिता मुलाखतीचेआयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-उमेदवारांनी येताना बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रती सोबत घेवून मुलाखतीस यावे.
-मुलाखत 10 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत घेण्यात येईल.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.